ग्राहकांसाठी आनंदाची बातमी : बुट-चप्पल खरेदी करताय?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जून २०२३ ।  पावसाळ्यात तर चिखलामुळे आणि पाण्यामुळे खराब होऊन चप्पल तुटण्याचं प्रमाण वाढतं. प्रत्येक व्यक्तीला रोजच्या जीवनातील महत्त्वाचा भाग असलेल्या चप्पल आणि शूज. अशा वेळी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण भारतात यापुढे निकृष्ट दर्जाच्या फूटवेयरची विक्री होणार नाही. 1 जुलै 2023 पासून भारतात निकृष्ट दर्जाच्या फूटवेयर निर्मितीवर आणि विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. सरकारने फूटवेयर युनिट्सना जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे पालन करून क्वालिटी कंट्रोल ऑर्डर(QCO) लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या आदेशानंतर देशात निकृष्ट दर्जाच्या फूटवेयरचे उत्पादन आणि विक्री दोन्ही बंद होणार आहे. यासाठी सरकारने फुटवेअर कंपन्यांना सूचना दिलेल्या आहेत. सरकारने फूटवेयर कंपन्यांसाठी स्टँडर्ड लागू केली आहेत. ज्याचे पालन करून त्यांना आता शूज आणि चप्पल बनवावी लागणार आहे. 27 फुटवेअर प्रोडक्ट्सचा QCO च्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे.

1 जुलैपासून बदलणार नियम सरकारने फुटवेयर कंपन्यांना क्वालिटी कंट्रोल ऑर्डरचं पालन करण्याचा सल्ला दिलाय. यासाठी स्टँडर्ड ठरवण्यात आलेय. नवीन नियमांमध्ये फुटवेयर निर्माणसाठी टेस्टिंग लेबोरेटरी, बीआयएस लायसेन्स आणि आयएसआय मार्कच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. सरकारने 1 जुलैपासून QCO ला सर्व फुटवेयर कंपन्यांसाठी अनिवार्य केलं आहे. सरकारने निर्देश दिल्यानंतर देशात निकृष्ठ क्वालिटीचे बुट आणि चप्पल विकले जाणार नाही. नवीन नियमाबाबत भारतीय मानक ब्युरोचे (BIS) महासंचालक प्रमोद कुमार तिवारी म्हणाले की, सध्या मोठ्या आणि मध्यम स्तरावरील उत्पादक आणि आयातदारांवर क्वालिटी स्टँडर्ड्सचे नियम लागू करण्यात आले आहेत. नंतर, 1 जानेवारी 2024 पासून, लहान फुटवियर उत्पादकांना देखील त्याचे पालन करावे लागणार आहे. ते म्हणाले की क्वालिटी कंट्रोल ऑर्डर (क्यूसीओ) केवळ फुटवेअर उत्पादनांची गुणवत्ता सुधारणार नाही तर निकृष्ट उत्पादनांच्या आयातीला आळा घालण्यास मदत करेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम