तरुणांना खुशखबर : राज्य सरकारने इतक्या पदासाठी दिले आदेश !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ एप्रिल २०२३ ।  राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त राज्य सरकारने अनेक घोषणा केलेल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवकांना केद्रस्थानी ठेवत राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पाय उचलले आहे.

त्यातलीच एक महत्वाची घोषणा म्हणजे सरळसेवा कोट्यातील रिक्त असलेली 75 हजार पदे भरण्याची घोषणा. यातील 20 हजार रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारने याआधीच आदेश काढले होते. त्यापाठोपाठ आता पुन्हा 19 हजार पदे भरण्यासाठीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ही सर्व पदे 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरण्यात येणार आहेत. या आदेशामुळे राज्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम