गुगलने वाचविला मुंबई पोलिसांच्या मदतीने तरुणाचा जीव !
दै. बातमीदार । १७ फेब्रुवारी २०२३ । आपल्याला जी माहिती माहित नाही ते आपण कधीही कुठेही व केव्हाही गुगलला विचारत असतो, अशाच एका तरुणाने वेदना न होता आत्महत्या कशी करावी यासंदर्भात सर्च केलं. याची दखल थेट अमेरिकेतील गुगलच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भातील सूचना केली. मुंबई पोलिसांनी या तरुणीचा लोकेशन ट्रॅस केली आणि 25 वर्षीय तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखलं. हि घटना मुंबई समोर आली आहे.
मुंबई पोलिसांच्या अदिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यूएस नॅशनल सेंट्रल ब्यूरो-इंटरपोलने दिलेल्या माहितीमध्ये आयपी अॅड्रेस आणि लोकेशनसंदर्भातील माहिती होती. याच माहितीच्या आधारे मंगळवारी दुपारी मुंबईतील कुर्ला परिसरामधील एका आयटी कंपनीमध्ये कार्यकर्त व्यक्तीने हे सर्च केल्याचं पोलिसांना समजलं. सूचना मिळाल्यानंतर पोलिसांची टीम या तरुणाला वाचवण्यासाठी त्याचा माग काढत त्याच्यापर्यंत पोहोचली. या तरुणाचं समोपदेशही करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण मूळचा जोगेश्वरीमध्ये राहतो. एका खासगी आयटी कंपनीमध्ये तो इंजिनियर म्हणून काम करतो. या तरुणाने आपल्या शिक्षणासाठी वेगवगेळ्या संस्थांकडून कर्ज घेतलं आहे. त्याला आता आपल्या घराचे हफ्तेही फेडता येत नसून तो आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. याच चिंतेतून त्याने त्रास न करुन घेता आत्महत्या कशी करावी यासंदर्भातील माहिती गुगलच्या माध्यमातून इंटरनेटवर सर्च करत होता. अमेरिकेतील एजन्सीने दिल्लीमधील इंटरपोलच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात अलर्ट केलं. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिल्याने या तरुणाचा जीव वाचवता आला. गुगलने मध्यंतरी सुसाईड या शब्दाबद्दलच्या सर्चमध्ये तांत्रिक बदल केले आहेत. या बदलांमुळे सुसाईड सर्च मारल्यावर आधी हेल्पलाइन क्रमांक सर्चमध्ये दाखवला जातो. आत्महत्या करण्याऐवजी समोपदेशन हा उत्तम मार्ग असल्याचं यामधून गुगलला सुचित करायचं आहे. वेगवगेळ्या देशांमध्ये त्या त्या देशांमधील हेल्पलाइन क्रमांक गुगल सर्चमध्ये सर्वात वरच्या स्थानी दिसतात. हे अशाप्रकारे तांत्रिक बदल करुन आत्महत्यासंदर्भातील माहिती सहज उपलब्ध न होऊ देणं गुगलच्या सुसाइड प्रिव्हेंशन धोरणाअंतर्गत येतं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम