राज्यातील सरकार कलंकित ; संजय राऊतांचा आरोप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ जुलै २०२३ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच टीळक पुरस्कार जाहिर झाला असून पुरस्कार स्वीकारण्याआधी मोदींनी टीळकांचे चरित्र वाचायला हवे, असा टोला लगावीत संजय राऊतांनी राज्य सरकारला कलंकित असल्याचा आरोप देखील केला आहे. ३ कलंकित खाती खातेदारांसह सरकारमध्ये सामील झाले असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे सरकार कलंकित असल्याचे आम्ही नाही तर, केंद्रीय तपास संस्था सांगत असल्याचे देखील ते म्हणाले.

कलंकित सरकारमध्ये फडणवीस हळद लावून बसले असल्याचे ते म्हणाले. पण ती हळद पिवळी नाही तर काळी असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीळक पुरस्कार जाहिर झाल्यावरही त्यांनी खोचक शब्दात टीका केली. मी पंतप्रधान आणि ज्या समितीने त्यांना पुरस्कार जाहिर केला त्यांना लोकामान्य टीळकांचे चरीत्र असलेले पुस्तक भेट म्हणून पाठवणार असल्याचे ते म्हणाले. पुरस्कार स्वीकारण्याआधी मोदींनी टीळकांचे चरित्र वाचायला हवे, अस देखील ते म्हणाले. महाराष्ट्राचे सरकार सध्या जेवढे कलंकित आहेत, तेवढे या आधी कधीच नव्हते, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. या सरकारमधील मंत्र्यांकडे शिखर बँक घोटाळ्यातील पैसा, तेलगीचा पैसा असा भ्रष्ट्राचारातून कमावलेला पैसा असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम