सरकारी नोकरी ; जाणून घ्या किती आहे जागा ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जानेवारी २०२३ । देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या तरूण आणि तरुणीना मोठी संधी प्राप्त झाली आहे. ज्यात तब्बल ६५ हजारांपर्यत वेतन मिळणार आहे. MPSC मेगा भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ८ हजार १६९ जागांची भरती केली जाणार आहे. यासाठीची पूर्वपरिक्षा राज्यातल्या ३७जिल्हा केंद्रावर होणार आहे. संयुक्त पूर्व परिक्षेच्या निकालावर मुख्य परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची मुख्य परिक्षा होणार आहे.

कधी होणार पूर्वपरिक्षा
३० एप्रिल

यातही महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही २ सप्टेंबर रोजी,

तर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

अर्ज कसा करावा?
एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरुन ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची मुदत २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी आहे.

कोणत्या पदांची जाहिरात
सहायक कक्ष अधिकारी पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी १५ जागा आहेत.
राज्य कर निरीक्षक पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी १५९ जागा आहेत.
पोलिस उपनिरीक्षक पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी ३७४ जागा आहेत.
दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी ४९ जागा आहेत.
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पदासाठी ३२,०००- १,०१,६०० एवढा पगार असून यासाठी ६ जागा आहेत.
तांत्रिक सहायक पदासाठी २९,२००- ९२,३०० एवढा पगार असून यासाठी १ जागा आहेत.
कर सहायक पदासाठी २५,५००- ८१,१०० एवढा पगार असून यासाठी ४६८ जागा आहेत.
लिपिक-टंकलेखक पदासाठी १९,९००- ६३,२०० एवढा पगार असून यासाठी ७०३४जागा आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम