राज्यपालांची कबुली ; राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जानेवारी २०२३ सहा महिन्यापासून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी एक ना अनेक वादात सापडले होते त्यामुळे सर्वच विरोधकांनी त्यांना हटविण्यासाठी आंदोलने केली होती. पण शुक्रवारी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात जैन समाजाला संबोधित करताना राज्यपाल व्यक्त झाले.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले कि, राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. अशी खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कायम आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुलेंबाबत केलेल्या विधानामुळे कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर रोज टीका होतीय. त्यांनी पदावर हटवण्याची मागण होतीय. दरम्यान, त्यांनी त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे.

राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी मला वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. परंतू मी ८० वर्षांचा झालो, त्यामुळे मी आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. मात्र, जेव्हा सन्यांसी आणि मुमुक्षरत्न राजभवनात येतात, तेव्हा मला आनंद होतो”, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम