ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या महिला विभागाची बैठक उत्साहात संपन्न ..

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सौ. मेधा भांडारकर यांनी अंमळनेर येथे आयोजित केली होती. त्यात मोठ्या संख्येने स्त्रिया व शालेय मुली सहभागी झाल्या होत्या. त्यात सौ.मेधा भांडारकर यांनी प्रथम सर्वांना ही माहिती दिली की अंमळनेर येथे ग्राहक पंचायत संस्थेची सुरुवात श्री. मनोहर भांडारकर वकील व श्री. विलास वाणी वकील यांनी केली होती.त्याची धुरा पुढे मा.राज्य ग्राहक संरक्षण परिषद सदस्य मंत्रालय मुंबई तथा ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे विभाग कार्याध्यक्ष श्री.विकास महाजन सरांनी सांभाळली व आता त्या वटवृक्षाचा खूप मोठा विस्तार झालेला आहे. सुरुवातीला ह्या कार्यात डॉ. सौ. माधुरी मनोहर भांडारकर यांनी पण हिरीरीने भाग घेतला होता. त्यांचाही या संस्थेच्या कार्यात मोठा वाटा आहे. तेव्हा आता पुरुषांबरोबरच आपण महिलांनी पण यात हिरीरीने भाग घेतला पाहिजे हे समजावून सांगण्यात आले.
सौ. मेधा भांडारकर यांनी सर्व महिलांना ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये, ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे काय? , ग्राहकांच्या तक्रारीसाठी निवारण कसे करता येते? याविषयी सविस्तर माहिती उदाहरणे सांगून समजावून सांगितली. शालेय विद्यार्थ्यांना “जागो ग्राहक जागो” या विषयावर निबंध लिहायला सांगितला आहे. त्यांना त्याबद्दलची माहिती सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्यात आली . शाळांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे व त्यांना त्यातून ज्या मुलींचे निबंध किंवा मुलांचे निबंध चांगले असतील ते निवडून त्यांना बक्षीस देण्यात येणार आहेत. या बैठकीला सौ. प्रतिभा वाणी,सौ. भारती सोनार ,सौ. आशा मराठे, सौ. रेखा जाधव,सौ.आशा सैंदाणी, पूर्वा जगताप, गायत्री, कार्तिकी, देवयानी, राजश्री ,भाग्यश्री, कोमल मराठे ह्या उपस्थित होत्या. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम