अमळनेर तालुक्यात 24 पैकी 13 ग्रा प वर राष्ट्रवादीचे सरपंच विराजमान… महाविकास आघाडी ठरली वरचढ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांचा दावा..
अमळनेर(आबिद शेख)तालुक्यात 24 पैकी 13 ग्रा प वर राष्ट्रवादीचे लोकनियुक्त सरपंच विराजमान झाले असून 16 जागांवर महाविकास आघाडीचे सरपंच विराजमान झाल्याने महाविकास आघाडीच वरचढ ठरल्याचा दावा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी केला आहे.यानिमित्ताने आमदारांच्या निवासस्थानी प्रचंड जल्लोष साजरा झाला.
आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामिण जनतेचे राष्ट्रवादी तथा महाविकास आघाडीला तालुक्यात कौल देऊन सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटास नाकारले असल्याचाही दावा सचिन पाटील यांनी केला आहे.ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बहुमताने विजयी झालेल्या उमेदवारांनी आमदार अनिल पाटील तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात धाव घेतली त्यांचा जि प सदस्या सौ जयश्री पाटील,जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील,तालुकाध्यक्ष सचिन पाटील,तालुका कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील यासह अन्य पदाधिकारी यांनी सत्कार केला.नागपूर अधिवेशनात असलेले आमदार अनिल पाटील यांनी मोबाइल द्वारे सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देऊन आगामी काळात कोणताही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.
तालुकाध्यक्ष सचिन पाटील बहुमताचा दावा करताना सांगितले की हा निकाल म्हणजे आगामी जि प व प स निवडणुकीची नांदी असून त्या निवडणुकीत देखील आमदारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचेच सदस्य विजयी होतील.सुरवातीला 4 गावांचे सरपंच पद बिनविरोध झाले होते, त्या पैकी 2 ग्रा प वर राष्ट्रवादी चे सरपंच बिनविरोध झालेत, आता 20 ग्रा प च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 13, काँग्रेस 2, सेना उद्धव ठाकरे गट 1 असे एकूण 16 सरपंच महाविकास आघाडीचे विजयी झाले आहेत, भाजपला चारच जागांवर विजय मिळाला आहे. तसेच 186 ग्राप सदस्या पैकी राष्ट्रवादी 110 च्या पुढे सदस्य विजयी झाले असून महाविकास आघाडीचे जवळ जवळ 130 च्या वर ग्रा.प सदस्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
येथे आहेत राष्ट्रवादी चे सरपंच
सचिन पाटील यांनी अधिकृतपणे दावा करताना या निवडणुकीत वावडे,सुंदरपट्टी, हेडावे, कामतवाडी, गंगापुरी, आमोदे, तासखेडा, रुंधाटी, जैतपिर, अंबारे-खापरखेडा, जानवे आदी ठिकाणी राष्ट्रवादी चे सरपंच विजयी झाल्याचा दावा केला असून नगाव बु व मारवड काँग्रेस, इंदापिंप्री सर्वपक्षीय, नगाव खुर्द शिवसेना उद्धव ठाकरे गट विजयी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणि भाजपा नेते बनावट दावा करीत असले तरी त्यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या उमेदवारांची गावनिहाय यादी व नावे जाहीर करावीत असे आव्हान देखील सचिन पाटील यांनी दिले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम