सिका इ मोटर्स च्या स्मॅक या हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचा भव्य लॉन्चिंग सोहळा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | १४ नोव्हेंबर २०२२ | शुक्रवार, दि. ११नोव्हेंबर रोजी जळगाव एमआयडीसी स्थित हॉटेल फोर सिजन, येथे सिका इ मोटर्स च्या स्मॅक या हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर चा भव्य लॉन्चिंग सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील तसेच जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, सन्मानचिन्ह व रोपटे देऊन करण्यात आले. तदनंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीराम पाटील यांनी प्रास्ताविक केले, यात त्यांनी उपस्थितांना स्मॅक या स्कूटर बद्दल अधिक माहिती दिली. ३३ वर्षीपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात यशस्वीरीत्या सर्व्हिस देऊन उत्कृष्ठ सव्हिस देणे हेच कर्तव्य मानून वाटचाल करीत आलेलो आहोत. त्यासोबतच खानदेशातल्या प्रत्येक शहर, गाव, खेडे यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून स्वतःपासून सुरुवात करून आपला परिसर प्रदूचण ठुकत करण्याचे आवाहन केले. ग्राहक सेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य घेऊन जास्त ग्राहक न बनवता ग्राहकांसोबत जास्तीत जास्त नाते मजबूत व्हावे यावर आम्ही जास्त भर देतो असे प्रतिपादन श्रीराम पाटील यांनी केले.
स्मॅक या स्कूटर बददल सांगतांना त्यांनी सांगितले कि, हि स्कूटर आरटीओ पासिंग प्रकारातील असून यात ६० व्होल्ट ची दमदार लिथियम आयन बॅटरी चा समावेश केलेला आहे. या बॅटरीमुळे सदरील स्कूटर प्रति चार्ज १०० किलोमीटर चालेल असा कंपनीचा दावा आहे. या स्कूटर मध्ये डिजिटल डिस्प्ले, रिजनरेटिव्ह कंट्रोलर, टेलिस्कोपिक सस्पेंशन, अँटीथेफ्ट अलार्म सिस्टिम, रिव्हसे गियर, साईड स्टॅन्ड सेन्सर, ट्युबलेस टायर्स तसेच यूएसबी चार्जर यासारख्या विविध सुविधा उपलब्ध असून, सदर स्कूटर ७ तिविध रंगात उपलब्ध आहे. वाढते प्रदूषण आणि इंधनाची बचत यासाठी इलेक्ट्रिक वाहन किती
आवश्यक आहे याची गरज बघता जैन उद्‌योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांनी त्याच क्षणी २५ स्कूटर खरेदी करण्याचे आश्‍वासन देऊन बुकिंग केले. तसेच सर्जना मीडिया चे संचालक रवींद्र लड्ढा यांनी ५ स्कूटरचे व लक्ष्मी केमिकल चे डायरेक्टर सी जे सूर्यवंशी यांनी १ स्कूटर त्याचक्षणी बुक केली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, सातपुडा ऑटो चे संचालक डी. डी. बच्छाव, बँक ऑफ महाराष्ट्र च्या झोनल मॅनेजर सौ रशिमिरेखा पती, चिन्मय क्रिटिकल केअर सेंटर चे डॉ. राहुल महाजन, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे व्हाईस प्रेसिडेंट युसूफभाई मकरा, जळगाव जिल्हा मेडिकल डीलर्स असोसिएशन चे प्रेसिडेट सुनील भंगाळे, सर्जना मीडिया सोल्युशन चे अध्यक्ष रवींद्र लडढा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पगारिया ऑटो चे संचालक पुखराजजी पगारिया होते. खानदेशातील जळगाव सारख्या ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटर
चे उत्पादन होणे ही सर्व खानदेश वासियांना अभिमानाची बाब आहे. तरुणांनी श्रीराम पाटील यांचा आदर्श घेऊन नोकरी न करता व्यवसायाभिमुख व्हावे असे अध्यक्ष पुखराज पगारिया यांनी सांगितले. आभार प्रमोद पाटील यांनी मानले.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like