
आजोबांनी चिअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया ; राणेंची खोचक टीका !
दै. बातमीदार । ९ जानेवारी २०२३ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाल्यावर राज्यातील विरोधाकाकडून टीका होणार नाही असे होवू शकत नाही. यावर लागलीच भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.
नीलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, एमसीएच्या अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. निलेश राणे यांनी म्हटले आहे की, आमदार रोहित पवार यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चिअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया.
पुण्यातील गहुंजे स्टेडियवर रविवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बैठक पार पडली. यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. क्लब गटाकडून आमदार रोहित पवार यांची सदस्यपदी निवड झाली. त्यानंतर त्यांची ‘एमसीए’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ‘एमसीए’च्या 16 सदस्यीय समितीत रोहित पवार नव्याने जोडले गेले आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम