आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची मोठी संधी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ नोव्हेबर २०२३

राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक तरुण तरुणी बेरोजगार आहेत. याच आयटीआय उत्तीर्णांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिसच्या 303 जागांची भरती होत आहे. नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड असेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे.

कोपा, वीजतंत्री, तारतंत्री, रेफ्रिजेशन आणि एसी मेकॅनिक, नळ कारागीर, डीटीपी ऑपरेटर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, आरेखक स्थापत्य, भूमापक आणि मेकॅनिक मोटर व्हेईकलच्या पदांसाठी अप्रेंटिसची भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आयोजित केली आहे. संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीसाठी पात्र ठरविले जाईल. औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे लेखी अर्ज सादर करता येईल. लेखी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक पाहा.
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 07 नोव्हेंबर 2023
लेखी अर्जाची शेवटची तारीख : 09 नोव्हेंबर 2023

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम