ग्राहकांना मोठी संधी ; सोन्यासह चांदीत मोठी घट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जून २०२३ ।  सध्या देशात लग्नासराई जरा कमी प्रमाणात झाली असल्याने भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. यामुळे ज्या लोकांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांचा आज सुवर्ण संधी आहे.

सोन्याचा भाव 59 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव प्रतिकिलो 71 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59601 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 71423 रुपये आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव शुक्रवारी संध्याकाळी 60308 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज (सोमवार) आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी 59601 रुपयांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 60,330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर दिल्लीत 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 60,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम