‘हटके करियर’ या विषयावर सुबोध सराफ यांचे मार्गदर्शन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जानेवारी २०२३ येथील रोटरी क्लब जळगाव संचालित इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून ला.ना.सार्वजनिक हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी ‘हटके करियर’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

आर्टिस्ट सुबोध सराफ यांनी चित्रकला, डिझाईन आणि कॅलिग्राफीमधील करियर विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी अहमदाबाद येथील एनआयडीमधील करियर आणि त्याची तयारी तसेच प्रॉडक्ट डिझाईन, लाईफ स्टाईल डिझाईन या क्षेत्रातील करियरबद्दल राेजच्या जीवनातील उदाहरणे देत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष राजेश वेद, इंटरॅक्ट कमेटी चेअरमन पंकज व्यवहारे, मुख्याध्यापक दुर्गादास मोरे, पर्यवेक्षिका भारती गोडबोले, रोटरीच्या स्वाती ढाके, हेमीन काळे, वनिता वेद यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन शिक्षक वानखेडे यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम