गुजरात निवडणूक : पंतप्रधान मोदीसह गृहमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ डिसेंबर २०२२ ।  संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात निवडणुकीचे आज दुसऱ्या टप्यातील मतदान होत आहे. यात आज सकाळी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांनी मतदान केले. दुसऱ्या टप्प्यामध्ये १४ जिल्ह्यांतील 93 मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे.

आज सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबासोबत जात मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबाद येथील नारणपुरा येथील केंद्रावर त्यांनी मतदान केलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भावाच्या घरी गेले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत किती टक्के मतदान होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. गुजरात निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे. गुजरातमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १९.०६ टक्के मतदान पार पडलं आहे. त्यापूर्वी ९ वाजेपर्यंत ४.७ टक्के मतदान झालेलं. २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये या ९३ जागांपैकी ५१ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ३९ आणि अपक्षांनी ३ जागांवर यश मिळवलं होतं. परंतु उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसने १७ जागांवर तर भाजपने १४ जागांवर जय खेचून आणला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम