“८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हेच शिवसेनेचे बाळकडू” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा...

 

“८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हेच शिवसेनेचे बाळकडू” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, ५०० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप : ५६० नव्या सदस्यांची शिवसेना नोंदणी

जळगाव, प्रतिनिधी “विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयासाठी सातत्याने अभ्यास करावा, मोबाईलपासून अंतर ठेवावे आणि जिद्द, कष्ट व संयम यांची कास धरावी. प्रत्येक यश हे मेहनतीचं फळ आहे.” “शिवसेनेच्या वाटचालीत समाजकार्य हा केंद्रबिंदू राहिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वाला अनुसरून शिवसेना (शिंदे गट) कार्यरत आहे. शिवसेना सदस्य नोंदणी ही सामान्य जनतेच्या हितासाठी झटण्याची शपथ आहे,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांनी केले.*

शिवाजीनगर येथील प्रभाग क्रमांक २ मध्ये श्री गणेश क्रीडा सामाजिक व शैक्षणिक संस्था, गुरुमाऊली महिला बचत गट व नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणगौरव समारंभ, वह्या वाटप व शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रमात पालकमंत्री पाटील यांनी वरील विचार व्यक्त केले.

*१५ गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान*
या कार्यक्रमात *दहावीचे* – सत्यम पुरोहित, जान्हवी वाणी, पूर्वा खोले, अक्षरा जैस्वाल, कुणाल देशमुख, गायत्री सोनार, हुड्डा खाटीक, मोहित बारेकर, सायली सोनार, *बारावीचे* -चेतन कुमावत प्रांजली पाटील सोहन वागले दर्शन पाटील यांचा परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले बद्दल शाल, श्रीफळ, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याशिवाय ५०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात ५६० नागरिकांनी शिवसेना (शिंदे गट) सदस्य म्हणून नोंदणी केली. ही माहिती ॲड. दिलीप पोकळे यांनी दिली.

*यांची होती उपस्थिती*
या प्रेरणादायी कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, महिला जिल्हाध्यक्ष सरिताताई कोल्हे, महानगर प्रमुख संतोष पाटील, शहरप्रमुख कुंदन काळे, किशोर बाविस्कर, गणेश सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्याम कोगटा, ॲड. दिलीप पोकळे, चेतन संकत, स्वप्निल परदेशी, हर्षल मावळे, ज्योतीताई शिवदे, संस्थेचे पदाधिकारी अतुल हराळ, श्रीकांत सोले, पंकज खोले, सिद्धार्थ, स्वप्निल, सागर दारकुंडे, नितीन महांगडे, भैय्या पालोदकर, दीपक जगताप, आबा बाविस्कर, तसेच महिला कार्यकर्त्यांमधून ज्योत्स्ना दारकुंडे, पायल हराळ, वैष्णवी घाडगे, छाया शिंपी, पुनम दारकुंडे, कल्पना सोनार, रेखा नेरकर, जयश्री निळे, जया खोले, हेमा दलाल, आशा पोळ, सरला विश्वकर्मा, चित्रा सोनवणे, शितल शिंपी आदींचा सहभाग उल्लेखनीय ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू महांगडे यांनी केले, तर प्रास्ताविक अतुल हराळ यांनी केले. आभारप्रदर्शन माजी नगरसेवक व संयोजक नवनाथ दारकुंडे यांनी मानले.
या प्रसंगी एका बालविद्यार्थिनी शौर्य हराळ हिने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व छोट्या भाषणाने वातावरण भारावून टाकले. छत्रपती शिवाजीनगर वासीय यांच्यावतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, आत्मविश्वास आणि प्रेरणा स्पष्टपणे दिसून येत होती. पालक आणि नागरिकांच्या मनात एकच भावना होती – “पालकमंत्री असावेत तर गुलाबराव पाटील यांच्यासारखे.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम