
वीर गुर्जर सेनेचे अल्पावधित कार्य कौतुकास्पद – डॉ. सुरेश दादा पाटील
वीर गुर्जर सेनेचे अल्पावधित कार्य कौतुकास्पद – डॉ. सुरेश दादा पाटील
आंतरराष्ट्रीय गुर्जर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती
जळगाव / प्रतिनिधी
वीर गुर्जर सेनेचे अल्पावधित कार्य कौतुकास्पद असून वीर गुर्जर सेनेची गावा गावात स्थापना करून सामाजिक संघटन वाढवावे तरी त्यांच्या कामाची सामाजिक बांधिलकी योग्य असल्याने ते भविष्यात समाजाभिमुख कार्य करतीलच याची मला खात्री आहे. वीर गुर्जर सेनेचे समाजकार्य गावागावात पोहोचावे व वीर गुर्जर सेनेचे कार्यकर्ते तयार करून वेगवेगळे उपक्रम राबवून समाजाला नवी दिशा देण्याचे काम करीत आहे असे प्रतिपादन डॉ. सुरेश दादा पाटील (चहार्डीकर) यांनी वीर गुजर सेना तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय गुर्जर दिनानिमित्त गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले.
महान राजा गुर्जर सम्राट मिहीर भोज यांच्या जयंतीच्या दिवशी आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस साजरा केला जातो. जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृहात वीर गुर्जर सेना तर्फे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात महान राजा वीर मिहीर भोज यांच्या फोटो प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. सुरेश पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी (भाटपुरे), धर्मवीर नागला जी(दिल्ली), समाधान पाटील, ॲड. भगवान जी पाटील, चंद्रकांत यादव जी यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास ज्ञानेंद्रजी प्रधान (उदयपूर), किशनसिंग जी (उदयपूर), सोनी सोळुंखे (उदयपूर), जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील, वीर गुर्जर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील, मंगल बी पाटील, उपाध्यक्ष पत्रकार राजेंद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरण संभाजी पाटील सर, पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील यांचे सह गंभीर चौधरी, भरत पाटील, चंपालाल पाटील, सागर पाटील, गोपाल पाटील, गणेश जाधव, गोपाळ चौधरी, विशाल पाटील, मयूर गुर्जर, माही जाधव, योगेश पाटील, नरेंद्र चौधरी, वाय . पी. पाटील, महेंद्र पवार, अनिल पाटील, मनोहर पाटील, लक्ष्मण पाटील, राहुल चव्हाण, योगराज पाटील, सूर्यकांत पाटील, रोहित चौधरी, भरत पाटील, हेमराज पाटील, संजय चौधरी, विश्वनाथ चौधरी, ईश्वर चौधरी, ईश्वर पाटील, प्रमोद पाटील, ॲड. विनोद पाटील, ॲड. सतीश पाटील, संजय चौधरी, पत्रकार अजय पाटील, पत्रकार सुरेश जी कोहली यांचे सह शेकडो समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी व निवेदक प्रफुल्ल पाटील (वडनगरी) यांनी तर प्रदेशाध्यक्ष किरण पाटील सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम