जळगावमध्ये २ लाखांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त

बातमी शेअर करा...

जळगाव शहरातील गुरुदेव नगरातील एका गोडाऊनमध्ये सोमवारी, २४ जून रोजी रात्री ११.३० वाजता अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून २ लाख १९ हजार ६५० रुपयांचा गुटखा, तंबाखू आणि पानमसाला जप्त केला. या कारवाईत प्रतिबंधित पदार्थांचा साठा सापडला. गोडाऊन मालक अरुण पाटील यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. अधिकारी शरद पवार आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तरित्या हा छापा टाकला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम