हंसिका अडकणार डिसेंबरमध्ये विवाह बंधनात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ ऑक्टोबर २०२२ ।  दिवाळी नुकतीच होवून गेली आहे सर्वात आता लग्नाची तयारी झाली असून सर्वत्र लग्नाची धामधुम पहायला मिळणार आहे. बॉलिवूडमध्येही लग्नाची धामधुम पहायला मिळणार आहे. सिंगर पलक मुच्छालही लवकरच प्रियकर मिथूनसोबत लग्न बंधनात अडकणार आहे त्याच्या पाठोपाठ सिद्धार्थ आणि कियारा, आथिया के.एल.राहुल यांच्यासुद्धा लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच आता चित्रपटसृष्टीतील अजून एक अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. ती माहिती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नाची आहे.

बॉलिवुड अभिनेत्री हंसिका मोटवानी एका महिन्याच्या कालावधीच्या आतच विवाहबंधनात अडकणार आहे. हंसिका ४ डिसेंबरला लग्न करणार आहे. लग्नविधी 2 डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान आयोजित केला जाणार आहे. हंसिकाचं लग्न डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे. या विवाहसोहळ्यात फक्त त्यांचे कुटुंब आणि जवळचे मित्रचं सहभागी होणार आहेत. हा लग्न समारंभ जयपूरला पार पडेल. समोर आलेल्या माहितीनुसार 2 ते 4 डिसेंबर मध्ये मेहेंदी, संगीत आणि हळद समारंभ होणार आहे. प्रत्येक दिवसाचा ड्रेस कोड आणि थीम असणार आहे. हा विवाह जयपूरमधील मुंडोटा किल्ला आणि राजवाड्यावर आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितल आहे.

तिच्या जवळच्या मित्राच्या माहितीनुसार प्रेम विवाह आहे हंसिका तिच्या प्रियकराशी लग्न करत आहे,ज्याला ती आता काही वर्षांपासून ओळखते.नवऱ्या मुलाचं नाव आणि ओळख दोन्ही अजून उघड झालेलं नाही याबाबत हंसिकाने मीडियाला काहीच स्टेटमेंट दिलेलं नाही. तर लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो दुसरा कोणीनसून तिचा मित्र आणि बिझनेस पार्टनर सोहेल कथुरियासोबत असल्याचं बोललं जात आहे. हंसिका आणि सोहेल हे 2020 मध्ये स्थापन झालेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार असल्याचे सांगितले जाते. याआधी हंसिका तीन चित्रपटांमध्ये तिचा सहकलाकार सिम्बू याला डेट करत होती. 2013 मध्ये या जोडप्याने त्यांचे नाते उघड केले होते मात्र 2014 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम