अमृता फडणवीसांच्या होळीनिमित्त हटके शुभेच्छा ; व्हिडीओ व्हायरल !
दै. बातमीदार । ७ मार्च २०२३ । राज्यात होळी आणि धूलिवंदन सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वजण मोठ्या उत्साहता हा सण साजरा करताना दिसत आहेत. नेहमीच आपल्या विशिष्ट लुकमुळे नेहमी चर्चेत असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायीका अमृता फडणवीस यांनी होळीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहत. त्यांची मुलगी दिवीजा फडणवीस आणि त्यांचा पाळीव पोपट यांच्यासोबतचच्या दोन व्हिडीओ क्लीप शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी “धरती के सभी प्रणियो को होली की शुभकामनाएँ!” असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे.
धरती के सभी प्रणियो को होली की शुभकामनाएँ !#HappyHoli #Holi2023 #होली pic.twitter.com/fDEi02Pfa0
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 7, 2023
होळीचा उत्साह राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज मुंबईत होळी साजरी केली. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी होळी आणि धूलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा केला. नातू रुद्रांशसोबत रंग खेळताना ते या व्हिडीओ देखील समोर आला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम