अजित पवारांनी निधी दिल्याने आनंद ; जयंत पाटील !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जुलै २०२३ ।  राज्यातील सत्तेत सहभागी झालेला अजित पवार यांनी नुकताच निधी वाटप केला असून यात राष्ट्रवादीच्या आमदारांना भरमसाठ निधी दिल्याची सकाळपासून चर्चा असतांना आता शरद पवार यांच्या गटातील जयंत पाटील यांना देखील निधी मिळाला असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सरकारमध्ये अर्थ खात्याची सूत्रे हाती येताच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या कारभाराची चुणूक दाखवायला सुरूवात केली आहे. आपल्यासोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना अर्थमंत्री अजित पवार यांनी भरभरून निधी दिल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे बंडखोरीनंतर अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करणारे व टीका करण्यात सर्वात पुढे असणाऱ्या जयंत पाटील यांनाही अजित पवारांकडून निधी देण्यात आला आहे. त्यावर जयंत पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. लोक प्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघात निधी मिळाला तर थोडीशी खुशी राहणारच ना, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम