हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचा दशकपूर्ती सोहळा उत्साहात

बातमी शेअर करा...

छत्रपती संभाजीनगर;- सालाबादप्रमाणे सलग 10व्या वर्षीही हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे शिक्षकांसाठी ईद ए मिलादुन्नबी निमित्त राज्यस्तरीय निंबध स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विजेत्यानां पारितोषिक व ट्रॉफीचे वितरण करण्यात आले. तसेच शिक्षकामधुन उत्कृष्ट शिक्षण देणाऱ्यां शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमचे औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेब, तर प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे प्रसिद्ध वकील ॲड. खिजरजी पटेल, प्रमुख उपस्थिती सिल्लोडचे माजी नगरसेवक कॉ. शेख बाबू, औरंगाबाद मनपाच्या माजी नगरसेविका फिरदौसजी फातिमा रमजानी खान, आदर्श शिक्षक समितीचे दिलीपजी ढाकणे, श्रीरामजी बोचरे सर आदींची उपस्थिति होती.

कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली. सर्वप्रथम सर्व प्रमुख पाहुण्यांचे हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनच्या परंपरेनुसार सर्वाना पुस्तक व शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. प्रथम ईद मिलादून्नबी निमीत्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील अनुक्रमाने प्रथम, द्वितीय अणि तृतीय विजेत्यांना एक पुस्तक, शानदार ट्राफी, सन्मान पत्र व रोख रक्कम बक्षिसे देण्यात आली. तसेच या वर्षी दोन प्रोत्साहनपर बक्षिसे अनुक्रमे देण्यात आले. तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक-शिक्षिका पुरस्कार 2023 राज्यातून 6 शिक्षकांना देण्यात आले. तसेच 10 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वाटप करण्यात आले.

सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक-शिक्षिकांना मान्यवराच्या हस्ते शानदार ट्राफी, सन्मान पत्र एक पुस्तक आणि शाल देऊन सन्मान करण्यात आले. कार्यक्रम मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे हा सोहळा थाटात उत्साहात पार पडला,कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सय्यद मु़ंतजिब चिश्ती सर यांनी केले तर प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर तर अध्यक्षीय मार्गदर्शन भाषणात शिक्षक आमदार विक्रमजी काळे, ॲड. खिजरजी पटेल, फिरदौसजी फातिमा, दिलीपजी ढाकणे यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.

या कार्यक्रमामध्ये शिक्षक-शिक्षिका, मित्र परिवार तसेच शैक्षणिक कार्यकर्ते उपस्थित होते.या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, शेख शब्बीर ,शफीक पठाण, सय्यद ताजीम, अमोल कुळकर्णी, शाहरुख पठाण, ॲड. इरफान खान, शेख जफर, शेख साबीर, शेख यासेर, फरमान खान, शेख अलीम,शाहीन नाज, फैसल खान अहेमद, इम्रान खान, अरमान शेख, शेख अजहर आदींनी प्रयत्न केले…

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम