‘हर हर महादेव’ वादाच्या भोवऱ्यात;’शो’ पाडला बंद

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ नोव्हेबर २०२२ काल संभाजीराजे छत्रपती यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हर हर महादेवच्या निर्मात्यांना इतिहासाची मोडतोड केल्याबद्दल फटकारले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतल्यानंतर आता पिंपरीतील विशाल थिएटरमध्ये हर हर महादेवचा शो बंद पाडण्यात आला आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपट दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि मिताली महाजन यांच्या चित्रपटावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे.

प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर आणि सुबोध भावे यांचा बहुचर्चित हर हर महादेव चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्यानं त्यावरुन संभाजी बिग्रेड आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर हर हर महादेव आणि महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात यांच्या चित्रपटावर मोठा वाद सुरु झाल्याचे सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम