शिंदे-फडणवीसांमध्ये मांजर बोक्यांची वाटणी झालीये का? संजय राऊतांचा हल्लाबोल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ डिसेंबर २०२२ । शिंदे सरकारचे हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारला कोंडीत पकडत आहे. तर दुसरीकडे राज्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत शिंदे व फडणवीस सरकारवर हल्लाबोल करून टीका करीत आहे. संजय राऊत म्हणाले कि, 110 कोटींचा नागपूर भूखंड घोठाळा निश्चित झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा. यावर अजून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का? शिंदे-फडणवीसांमध्ये मांजर बोक्यांची वाटणी झालीये का?, अशी घणाघाती टीकाहि त्यांनी यावेळी केली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तसेच नागपूर येथील भूखंड घोटाळ्यावरून संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.
संजय राऊत म्हणाले, नागपूर येथे भूखंड वाटपाचा घोटाळा निश्चित झाला आहे. स्वत: उच्च न्यायालयाने यावरून शिंदे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एकनाथ शिंदे यांनी 83 कोटींहून अधिक किंमतीचे भूखंड केवळ 2 कोटीत बिल्डरांना विकले. याचे उत्तर एकनाथ शिंदेंना द्यावेच लागेल.

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रोज कानफडात मारत आहेत आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाल चोळत विधानसभेत जात आहेत. यापूर्वी महाराष्ट्राची एवढी बेअब्रू कधीही झालेली नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका बोटचेपी आहे. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात की सीमाप्रश्नासाठी आम्ही काठ्या खाल्ल्या आहेत. आता तो जोर कुठे गेला? आता जोश दाखवा ना. आता सीमाप्रश्नावर ठोस भूमिका घेणार नसाल तर मुख्यमंत्री पदावर बसण्यास तुम्ही योग्य नाही, अशी टीका एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांनी केली. संजय राऊत म्हणाले, सत्तेत येताच सीमावाद पेटला हीच एकनाथ शिंदे यांची क्रांती आहे. त्यांच्या तोडांत कुणी बोळा कोंबला आहे का? दिल्लीत सीमावादावरील बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना गुंगीचे औषध टोचून पाठवले आहे. मात्र, या प्रश्नावर लोकांच्या भावना तीव्र आहेत. हे सरकारला कळत नसेल तर कठीण आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम