तुमच्या पॅन कार्डची व्हॅलिडिटी संपली का ? हा सोपा उपाय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ फेब्रुवारी २०२३ । देशातील नागरिकांना आता पॅन कार्ड हे महत्वपूर्ण कागदपत्र असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेक नागरिकांनी पॅन कार्ड घेण्यासाठी अर्ज केले आहे तर काहींचे पॅन कार्ड असतांना त्यांची मुदत संपलेली असेल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

पॅन कार्डसोबत आधार लिंक करण्यासाठी नागरिकांकडे 31 मार्च 2023 पर्यंत वेळ आहे. तुम्ही या तारखेपर्यंत पेनल्टी भरून आधार-पॅन लिंक करू शकता. अन्यथा पॅन आधारशी लिंक होणार नाही आणि तुमचा पॅन इनव्हॅलिड होईल. आयकरदाते अवैध पॅनमुळे आयटीआर भरू शकणार नाहीत. इतकंच नाही तर यामुळे तुमची पॅन कार्डशी संबंधित इतर कामेही थांबतील. उदाहरणार्थ, बँकेत 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी पॅन आवश्यक आहे, परंतु पॅन कार्ड इनव्हॅलिड झाल्यावर हे करता येणार नाही. सध्या तुम्ही 1000 रुपयांमध्ये आधार कार्ड पॅनशी लिंक करू शकता. तुमचा पॅन 31 तारखेनंतर व्हॅलिड आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक आहे की नाही हे तुम्ही येथे तपासू शकता. हे कसं चेक करावंयासाठी काही स्टेप्स आपण जाणून घेऊया. जेणेकरून तुम्हाला आयकर वेबसाइटवर हे काम सहज करता येईल. 31 तारखेनंतर पॅन कार्डची व्हॅलिडिटी कशी चेक करावी हे आधी जाणून घेऊया…

व्हॅलिडिटी कशी चेक करावी? -सर्वप्रथम आयकर ई-फायलिंग वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in/home वर जा -यानंतर Verify Your PAN Details वर क्लिक करा. -आता तुमचा पॅन क्रमांक टाका. -यानंतर पॅन कार्डवर लिहिलेले पूर्ण नाव टाका. -पेजवर दिसणारा कॅप्चा कोड टाका आणि सबमिट करा. -यानंतर तुम्हाला वेबसाईटवर एक मेसेज दिसेल जो तुम्हाला कळेल की तुमचा पॅन सक्रिय आहे की नाही. -हे काम तुम्ही एसएमएसद्वारेही करू शकता. -यासाठी NSDL PAN सोबत तुमचा पॅन क्रमांक लिहून 567678 किंवा 56161 वर पाठवा.
-सर्व प्रथम incometax.gov.in वर जा. -‘Link Aadhaar Status’ या पर्यायावर क्लिक करा. -समोर उघडणाऱ्या नवीन विंडोमध्ये View Link Aadhaar Status वर क्लिक करा. -जर आधार-पॅन लिंक असेल तर तुम्हाला एक मॅसेज दिसेल. -जर आधार आणि पॅन लिंक नसेल तर तुम्ही ते इथेही लिंक करू शकता.
तुम्ही इन्कम टॅक्स वेबसाइटला भेट देऊन ‘link Aadhar’ या सुविधेसह आधार आणि पॅन लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल. त्यानंतर, तेथे दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून, तुम्ही पॅनला आधारशी लिंक करू शकता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम