अधिक मासात सोन्यासह चांदीचे दर पाहिले का ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ जुलै २०२३ ।  राज्यात अधिक मास सुरु असून सध्या सोन्यासह चांदी घेण्यासाठी अनेकांनी बाजारात गर्दी केली असून सध्या सोन्यासह चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत असून आज पुन्हा सोने चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे.

बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 55,150 रुपये असा सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 60,160 रुपये असा सुरू आहे. म्हणजेच मागील भावानुसार, आज सोन्याच्या 22 कॅरेटच्या भावात 150 रुपयांनी वाढ झाली असून 24 कॅरेटच्या भावात 160 रुपयांनी वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे, या महिन्यात सोन्याने ६० हजारांचा टप्पा पार केला आहे. तर मागच्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात फारसे काही बदल झालेले पाहायला मिळाले नाहीत. सोन्याच्या किमतींबरोबर चांदीच्या भावात देखील वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गुडरिटर्ननुसार, बुधवारी चांदीच्या 10 ग्रॅम भावासाठी 774 रुपये मोजावे लागले आहेत. याचबरोबर, 1 किलो चांदीसाठी 77,400 रुपये मोजावे लागणार आहेत. काल बाजारात चांदीच्या भावात घसरण झाली असता चांदी 10 ग्रॅमने 770 रूपयांनी सुरु होती. आजच्या भावानुसार चांदी चार रुपयांनी महागली आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,150 रुपये
मुंबई – 55,150 रुपये
नागपूर – 55,150 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 60,160 रूपये
मुंबई – 60,160 रूपये
नागपूर – 60,160 रुपये

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम