पाकिस्तानात पावसाचा कहर ; ७६ जणांचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० जुलै २०२३ ।  जगभरात बदलत्या हवामानामुळे पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी आणि खराब हवामानामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 133 लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 31 मुलांचाही समावेश आहे. गेल्या 24 तासात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे 78 घरांचीही पडझड झाली आहे. तेथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे.

पावसाचा सर्वाधिक परिणाम पाकिस्तानच्या पंजाब प्रांतावर झाला असून, तेथे 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तिथे पावसाने गेल्या 30 वर्षांचा विक्रमही मोडला असून, एका दिवसात 291 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, लाहोरमध्ये 6 जुलै रोजी झालेल्या पावसात रस्त्यावर उभी असलेली वाहनेही बुडाली होती.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात गुरुवारी भूस्खलनामुळे क्रिकेट खेळत असलेल्या 8 मुलांचा मृत्यू झाला. येथे अतिवृष्टीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या 20 वर गेली आहे. पावसामुळे सर्वाधिक बाधित झालेला हा दुसरा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. कोसळलेल्या इमारतींचा फटका आणि विजेचा धक्का लागून लोकांना जीव गमवावा लागत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पाकिस्तानमध्ये हवामान बदलामुळे मोसमी पावसाचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे पाकिस्तानात 1700 लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, 33 लाख लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम झाला

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम