देशात पावसाचा हाहाकार ; नर्मदा नदीला महापूर ; पर्यटक अडकले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ सप्टेंबर २०२३

देशातील अनेक राज्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे तर दक्षिण मध्य प्रदेशात पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. नर्मदा नदीला महापूर आल्याने इंदोरवरुन महाराष्ट्रात येणारा इंदूर बुऱ्हानपूर सोलापूर महामार्ग २४ तासांपासून बंद झाल्याने महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दक्षिण मध्यप्रदेशात गेल्या 48 तासांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा आणि शिप्रा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. ओंकारेश्वर जलाशयातील पाण्याचा मोठा विसर्ग नर्मदा नदीत सोडल्यामुळे नर्मदा नदीला पूर आला आहे.

या पुरामुळे उज्जैन- इंदोर – बुऱ्हानपूर – सोलापूर महामार्ग गेल्या 24 तासापासून बंद आहे. मोरटक्का येथील नर्मदा नदीच्या पुलावरून दोन फूट पाणी असल्याने हा महामार्ग गेल्या 24 तासांपासून बंद ठेवण्यात आला आहे. विकेंड व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील काही पर्यटक मध्य प्रदेशात अडकले असण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात अजूनही पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती खांडव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ओंकारेश्वर आणि मोर टक्का परिसरात बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. नर्मदा आणि शिप्रा नदीला आलेल्या महापुरामुळे मध्य प्रदेशात हाहाकार उडला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम