HDFC बँकने लॉन्च केलं खास क्रेडिट कार्ड !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ एप्रिल २०२३ ।  देशात अनेक बँक आहेत ते आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर सादर करीत असतात अशीच एक ऑफर आता HDFC बँकेने सादर केली आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे होणारे ट्रांझेक्शन देशात वेगाने वाढले आहेत. या सुविधेद्वारे, तुम्ही काही सेकंदात कधीही आणि कुठूनही कोणालाही पैसे पाठवू शकता.पूर्वी UPI पेमेंटची सुविधा फक्त बँक खात्याद्वारेचे करता येत होती.

मात्र आता रुपे क्रेडिट कार्डद्वारेही UPI पेमेंट करता येणार आहे. दरम्यान आता खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेने HDFC बँक UPI RuPay क्रेडिट कार्ड, UPI पेमेंट करण्यासाठी एक विशेष क्रेडिट कार्ड लॉन्च केलेय. तुम्ही या क्रेडिट कार्डला BHIM, Paytm, PhonePe, Freecharge, PayZapp, Mobikwik सारख्या सिलेक्टेड UPI अ‍ॅप्सशी लिंक करून UPI ​​पेमेंट करू शकता. हे कार्ड फिजिकल फॉर्ममध्ये जारी करण्यात येणार नाही. हे व्हर्चुअल फॉर्मध्ये जारी करण्यात येईल. हे क्रेडिट कार्ड NPCI च्या RuPay नेटवर्कवर आधारित असेल. रुपे कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व ऑनलाइन वेबसाइटवर हे कार्ड वापरले जाऊ शकते.

HDFC बँक UPI रुपे क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये कोणती?
-या क्रेडिट कार्डद्वारे, तुम्हाला ग्रोसरी, सुपरमार्केट, डायनिंग आणि PayZap वर खर्च करण्यावर 3 टक्के कॅश पॉइंट्स (रिवॉर्ड रेट – 0.75 टक्के) मिळतील. या कॅटेगिरीमध्ये, तुम्ही एका महिन्यात जास्तीत जास्त 500 रोख पॉइंट मिळवू शकता. -या क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी पेमेंट केल्यावर तुम्हाला 2% कॅश पॉइंट (रिवॉर्ड रेट – 0.50%) मिळतील. या कॅटेगिरीमध्ये देखील, तुम्ही एका महिन्यात जास्तीत जास्त 500 कॅश पॉइंट्स मिळवू शकता. -याशिवाय, तुम्हाला इतर कॅटेगिरीमध्ये 1 टक्के कॅश पॉइंट (रिवॉर्ड रेट- 0.25 टक्के) मिळतील. या कॅटेगिरीमध्ये देखील, तुम्ही एका महिन्यात जास्तीत जास्त 500 रोख गुण मिळवू शकता. – रेंट पेमेंट, वॉलेट लोड, ईएमआय ट्रांझेक्शन, फ्लूल आणि गव्हर्नमेंट कॅटेगिरीवर कोणताही कॅशबॅक मिळणार नाही.

-या कार्डची जॉईनिंग फी रु. 250 आहे. -या कार्डची रिन्यूअल मेंबरशिप फीस 250 रुपये आहे. एका वर्षात 25,000 रुपये खर्च केल्यानंतर रिन्यूअल फीस माफ केली जाते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम