
दै. बातमीदार । ११ फेब्रुवारी २०२३ । बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांचं लग्न 7 फेब्रुवारी रोजी जैसमेरमध्ये पार पडलं. त्यासोबतच अंबानी परिवाराकडून कियारा-सिद्धार्थला मिळालेल्या या गिफ्टची चांगलीच चर्चा सुरु आहे.
‘शेरशाह’ रिलीज झाल्यापासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराच्या जोडीबाबत त्यांचे फॅन्स खूपच एक्साईटेड होते.या विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूडसह उद्योग जगतातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. दोघांना विवाह सोहळ्यानिमित्त उद्योजक मुकेश अंबानींकडून खास भेट मिळाल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. 4-5 दिवसांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. राजस्थानच्या जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसवरील सिद्धार्थ कियाराच्या लग्नासाठी लक्झरी व्हिला बुक करण्यात आला होता. या व्हिलामध्ये तब्बल 84 खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं होतं. शाही थाटात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर चर्चा सुरु झाली ती या कपलला मिळालेल्या गिफ्टची.
मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी ही कियाराची लहानपणापासूनची मैत्रीण आहे. त्यामुळे या दोन्हही परिवारामध्ये जिव्हाळ्याचे संबंध आहेत. म्हणूनचा किनारा आणि सिद्धार्थाला रिलायन्स ट्रेंड फूटवेअरचे ब्रँड अँबॅसिटर करत अंबानी परिवाराने या नव्या जोडीला मोठे सरप्राईझ दिले आहे. रिलायन्स रिटेल वेंचर ट्रेंन्स फूटवेअरने गुरुवारी याबाबतची घोषणा केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम