बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर ; ९८ जणांचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जून २०२३ ।  देशातील काही राज्यात पावसाचा धुमाकूळ तर काही राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर मोठ्या प्रमाणात सुरु असतांना यूपी, बिहारसह 9 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेची लाट होती. पुढील तीन दिवस या राज्यांमध्ये तापमानात वाढ होणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत 98 जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे सिक्कीम, मेघालय या ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. आसाममध्ये 13 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. रस्ता वाहून गेल्याने 3500 पर्यटक अडकले होते. लष्कराने त्यांना सुरक्षित स्थळी नेले.

बिहारमध्ये हवामान खात्याने सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेच्या लाटेबाबत 6 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि 4 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. भोजपूर, अरवाल, औरंगाबाद, रोहतास, बक्सर आणि कैमूरमध्ये रेड अलर्ट आहे. तर पाटणा, नालंदा, जमुई, लखीसराय, बांका, शेखपुरा, बेगुसराय आणि खगरियामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गया, जेहानाबाद, भागलपूर आणि पूर्व चंपारणमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 12 वीपर्यंतच्या शाळा आणि अंगणवाड्या 24 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम