पंजाबमध्ये पावसाचा हाहाकार ; १३ जुलै पर्यत शाळांना सुट्टी जाहीर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० जुलै २०२३ ।  देशातील काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे तर काही भागात मात्र शेतकरी आज देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पंजाबमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने चंदीगड, पटियाला आणि एसबीएस नगरमध्ये पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पूर्व माळव्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर दोआबासाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सीएम भगवंत मानही मैदानात उतरले आहेत. काही वेळात ते सतलज नदीच्या काठावर वसलेल्या गावांना भेट देणार आहेत.

सतलज नदीला आलेल्या पुरामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. दुसरीकडे 13 जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे मुलांच्या सुरक्षेसाठी या काळात सर्व शासकीय, अनुदानित, मान्यताप्राप्त आणि खासगी शाळा बंद राहतील, असे शिक्षणमंत्री हरजोत बैंस यांनी सांगितले.

दुसरीकडे, गेल्या शनिवारपासून जिरकपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात गेल्या २४ तासांपासून वीज नाही. विजेअभावी लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुख्य सचिवांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. मुख्यमंत्र्यांनी लोकांना घाबरू नका असे आवाहनही केले आहे. पंजाब सरकारचे मुख्य सचिव अनुराग वर्मा यांनी अतिवृष्टीमुळे बचाव कार्य आणि पुढील तयारीबाबत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. ही बैठक चंदीगडमध्ये झाली. ज्यामध्ये पोलीस, पॉवरकॉम, प्रशासन, कृषी यासह अन्य विभागातील अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत मुख्य सचिवांनी जिल्ह्यांची स्थिती आणि बचाव कार्याची माहिती घेतली. आमदारही ग्राउंडवर उतरले आहेत. फतेहगढ साहिबचे आमदार लखबीर सिंग राय हे सरहिंदमधील बाधित भागातील लोकांना वाचवण्यासाठी ट्रॅक्टरवर निघाले. लोकांना ट्रॉलीमध्ये सुरक्षित स्थळी नेण्यात आले. त्याचवेळी फिल्लौर येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीजवळ सतलज नदीच्या काठावर बांधण्यात आलेल्या धुसी बंधाऱ्याला तडा गेला आहे. त्यामुळे महाराजा रणजित सिंग पोलीस अकादमीत पाणी शिरले आहे.गोल्फ क्लब रेंजच्या पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे 250 वाहने पाण्यात बुडाली आहेत. पंजाब पोलिसांनी वाहने बाहेर काढली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम