राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाचा हायअलर्ट !
दै. बातमीदार । २८ जून २०२३ । राज्यात जून महिना संपत आल्यावर पावसाचे आगमन झाले असून आता मान्सूनचा तुफान पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र मान्सून दाखल झाला असून काल आणि आज हवामान खात्याकडून राज्याला ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला. मुंबईसह उपनगरांत, रायगड, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरूवात झाली.
काल दिवसभरात नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. तर मराठवाड्यामध्ये देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान खात्याचा इशारा होता. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे 27 आणि 28 जून रोजी राज्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट असणार आहे.
तर महाराष्ट्रातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये तर विदर्भातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, 29 आणि 30 जूनला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होईल. पण यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही. गेल्या चोवीस तासांत मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस बरसला. तर, मंगळवारीही मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. मुंबईसह, पुणे, संपूर्ण कोकण, ठाणे, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि साताऱ्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भाच्या काही भागांतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
एवढेच नाहीतर पुढील तीन ते चार तासांत जळगाव जिल्ह्यामध्येही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अशात हवामान खात्याकडून राज्यात पुढील तीन ते चार तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुंबई, पुण्यासह तब्बल 7 जिल्ह्यांना वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम