या क्रिकेटरपेक्षा त्यांच्या पत्नीचे वय आहे मोठे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मार्च २०२३ । देशात अनेक धर्म, जात व पंथ आहे पण प्रत्येक जातीमध्ये लग्नाच्या वेगवेगळ्या परंपरा आहे. पण नवरदेवाच्या वयापेक्षा नवरी वयाने लहान असते. हे प्रत्येक धर्मात असते. पण आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत कि देशातील अनेक क्रिकेटर यांच्या पत्नीचे वय, जाणून घ्या कोण आहे ते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं वयाच्या 22 व्या वर्षी अंजली तेंडुलकरसोबत लग्नगाठ बांधली. 24 मे 1995 रोजी सचिन आणि अंजली यांचे लग्न झाले. अंजली ही सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. सचिन आणि अंजली यांना सारा आणि अर्जुन ही दोन अपत्ये आहेत. शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे. दोघांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली. आयशा ही शिखरपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. शिखर आणि आयशाला एक मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी आयशा आणि शिखर हे विभक्त झाले.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 17 डिसेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली. अनुष्का ही विराटपेक्षा सहा महिने मोठी आहे. विराट आणि अनुष्का यांची ‘पॉवर कपल’ अशी ओळख आहे. हार्दिक पंड्याने जानेवारी 2020 मध्ये नताशा स्टांकोविकसोबत लग्नगाठ बांधली. नताशा ही हार्दिकपेक्षा एक वर्ष सहा महिने मोठी आहे.

हार्दिक आणि नताशा यांनी गेल्या महिन्यात पुन्हा लग्नगाठ बांधली. क्रिकेटर जसप्रीत बुमराहने मार्च 2021 मध्ये संजना गणेशनसोबत लग्नगाठ बांधली. संजना ही जसप्रीतपेक्षा वयानं मोठी आहे. दोघांमध्ये एक वर्ष सहा महिने एवढे अंतर आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम