लंडनमधील ऐतिहासिक इंडिया क्लब होणार बंद !
बातमीदार | २३ ऑगस्ट २०२३ | स्वातंत्र्य चळवळीदरम्यान व्ही. के. कृष्ण मेनन आणि इतर अनेकांसह राष्ट्रभक्तांच्या भेटीचे ठिकाण ठरलेला लंडनचा ऐतिहासिक इंडिया क्लबला पुढील महिन्यात कुलूप लागणार आहे. लंडनच्या स्ट्रैंड स्ट्रीटच्या मध्यभागी असलेल्या इंडिया क्लबच्या चालकांनी काही वर्षांपूर्वी ऐतिहासिक बैठकीचे भोजनालय पाडण्याविरुद्धची लढाई जिंकली होती. परंतु, आता इमारतीच्या मालकांनी त्यांना तेथे आलिशान हॉटेल बनवण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.
चालक यादगार मार्कर आणि त्यांची मुलगी फिरोजा यांनी क्लबचे अस्तित्त्व कायम ठेवण्याच्या त्यांच्या संघर्षाचा भाग म्हणून ‘सेव्ह इंडिया क्लब’ मोहीम सुरू केली. मात्र, इमारतीच्या मालकांची नोटीस मिळाल्यानंतर त्यांना क्लब बंद करण्याची घोषणा करावी लागली आहे. इंडिया क्लबची मुळे इंडिया लीगमध्ये आहेत, ज्याने ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटनमध्ये प्रचार केला. कृष्ण मेनन, जे नंतर ब्रिटनमध्ये भारताचे पहिले उच्चायुक्त बनले, ते क्लबच्या संस्थापक सदस्यांपैकी होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम