गृहमंत्री शहा ईव्हीएम हॅक करतात ; ठाकरे गटाचा आरोप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ फेब्रुवारी २०२३ । देशातील भाजपला सर्व प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत. गृहमंत्री अमित शहा हे सॅटेलाइट नियंत्रित करून भाजपसाठी ईव्हीएम हॅक करतात. त्यांनी या कामासाठी माणसे ठेवली असून त्यातीलच एकाने मला ही गोपनीय माहिती दिली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते शिवगर्जना अभियानाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत होते.

खैरे म्हणाले की, इतर प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी भाजप ईडी, सीबीआय, आयकर विभाग, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांसारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर करत आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव देण्याच्या निर्णयाबाबत खैरे म्हणाले, निवडणूक आयोगाने केंद्राच्या दबावात येऊन काम केले. ईव्हीएमला आमचा विरोध आहे. यापुढील सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवरच व्हाव्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम