राजस्थानात भीषण अपघात : अमळनेरचे सहा जणांचा दुर्देवी मृत्यू !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ नोव्हेबर २०२३

दिवाळीच्या सुटीनिमित्त राजस्थानात पर्यटनासाठी गेलेल्या अमळनेर तालुक्यातील दोन शिक्षकांच्या कुटूंबातील सहा सदस्य कंटेनरने कारला दिलेल्या धडकेने ठार झाले. हा अपघात सोमवार, 13 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. सुरूवातीला या अपघातात पाच जण ठार झाले तर गंभीर जखमी असलेली महिला उपचारादरम्यान दगावली. अपघातात मयत झालेले सर्व सहा सदस्य मांडळ, ता.अमळनेरचे रहिवासी असून या अपघाताने गावावर शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे (55, रा.बेटावद) व योगेश धोंडू साळुंखे (34, अर्थे, ता.शिरपूर, रा.पिंपळे रोड, अमळनेर) या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब वाहन (क्रमांक एम.एच.04-9114) ने राजस्थान येथे दोन चारचाकींद्वारे फिरायला गेले होते. सोमवार, 13 रोजी दुपारी पावणे तीन वाजता बाडमेर रस्त्यावरील धौरीमन्ना गावाजवळ एका कंटेनरने चारचाकीला धडक दिल्याने भीषण अपघातात धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा बाबुलाल मैराळे ऊर्फ सुरेखा धनराज सोनवणे (50), त्यांची मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (5), गायत्री योगेश साळुंखे (30), त्यांचा मुलगा प्रशांत योगेश साळुंखे (7) आणि मुलगी भाग्यलक्ष्मी साळुंखे (एक वर्ष) असे सहा जण ठार झाले. सुरेखा सोनवणे (मैराळे) या गलवाडे येथे जि.प. शाळेत शिक्षिका होत्या. गत महिन्यात त्यांची मांडळ येथे समायोजनात बदली झाली होती. या अपघातात त्या जखमी झाल्या व पालमपूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत सायंकाळी मालवली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम