रिलेशनशिपची कसे असायला हवे ; अभिनेत्रीने दिला सल्ला !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ सप्टेंबर २०२३

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी पार्टनरवर असलेलं त्यांचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. तरुणांमध्ये रिलेशनशिपची नक्की व्याख्या काय आहे? नात्यामध्ये तरुण पिढी कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व देते? धकाधकीच्या जीवनात नातं टिकवण्यासाठी काय करावं लागतं? अशा अनेक चर्चे सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. अशात अनेक सेलिब्रिटी देखील रिलेशनशिपवर स्वतःचं मत मांडताना दिसतात. शिवाय अशात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने तरुणांना रिलेशनशिपबद्दल मोठा सल्ला दिला आहे.

ज्या अभिनेत्रीने तरुणांना रिलेशनशिपचा सल्ला दिला आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री जीनत अमान आहे. जीनत अमान बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच झालेल्या एका शोमध्ये जीनत अमान यांनी तरुणांनी रिलेशनशिप आणि डेटिंगबद्दल काही महत्त्वाचं सल्ले दिले आहेत. जीनत अमान आजच्या तरुणांना म्हणाल्या शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी विचार करावा असं जीनत अमान म्हणाल्या, ‘मला या गोष्टीची खंत वाटते. पण मला असं वाटतं नात्यामध्ये शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी काही काळ प्रतीक्षा करायला हवी. एवढंच नाही तर, स्वतःवर नियंत्रण देखील असायला हवं. दोघांनी देखील एकमेकांसाठी प्रतीक्षा करायला हवी.. कारण हे नातं फार अनमोल असतं आणि त्याला टिकवून ठेवणं तितकचं कठीण असतं..’ असं जीनत अमान म्हणाल्या.

महिलांनी आधी आर्थिकदृष्ट्या सक्षण व्हायला हवं, यावर देखील जीनत अमान यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जीनत अमान यांनी वयाच्या 17 व्या वर्षापासून पैसे कमावण्यास सुरुवात केली. त्या आर्थिकदृष्ट्या कधीही कोणावर अवलंबून राहिल्या नाहीत. जीनत अमान म्हणाल्या, ‘प्रत्येक महिलेने आत्मविश्वास बाळगला पाहिजे, स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले पाहिजे. ज्यामुळे महिला आत्मनिर्भर होतात. एवढंच नाही तर, त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेवू शकतात..’ जीनत अमान पुढे म्हणाल्या, ‘आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे म्हणजे केवळ स्वतःचा पैसा असणे असं होत नाही. तुम्ही इतरांवर अवलंबून न राहता आणि स्वतःच्या अटींवर जीवन जगण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळत असतं.. तसेच स्वतःचा सुधारण्याचा देखील हा उत्तम मार्ग आहे..’ जीनत अमान यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता त्या सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. शिवाय सोशल मीडियावर जीनत अमान यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम