तुम्हाला किती यातना होत असतील ; ठाकरे गटाची जोरदार टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जुलै २०२३ ।  राज्यातील विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडचिट्ठी देत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्या असून त्यांच्यावर आता ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे.

ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब म्हणाले कि, “शिवसैनिकांच्या मेहनीतवर नीलम गोऱ्हे यांनी चार वेळा आमदारकी उपभोगली. याबद्दल त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. परंतु ज्या शिवसैनिकांच्या जोरावर त्यांनी ही सगळी पदे उपभोगली, त्या शिवसैनिकांना हे पाहून (नीलम गोऱ्हेंचा शिंदे गटातील प्रवेश) किती यातना होत असतील, याचा विचार करावा.

आमदार अनिल परब म्हणाले, आपल्याला काही मिळत नाही, म्हणून पक्ष सोडणारे भरपूर आहेत, असं असलं तरी पक्षाच्या वाईट दिवसात लाखो कार्यकर्ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. त्यामुळे असे संधीसाधू लोक गेले असतील, तर त्यांची जागा आम्ही नक्कीच भरून काढू. त्याची काळजी आम्ही करत नाही. परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की, अशी सगळी पदं उपभोगल्यानंतर पक्षाला दगा देणं आणि वार करणं हे उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांना शोभत नाही. आमदार अनिल परब म्हणाले, नीलम गोऱ्हे आता शिंदे गटात गेल्या आहेत. त्यावर मी इतकंच सांगेन की, त्यांना जी काही आश्वासनं मिळाली असतील किमान ती पूर्ण व्हावीत, एवढीच आमची अपेक्षा आहे. ना इकडच्या ना तिकडच्या अशी त्यांची अवस्था होऊ नये.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम