कसं ओळखायचं? गॅस सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० जुलै २०२३ | सध्या देशात मोठी महागाई सुरु असतांना याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत असून त्यात जास्त महागाई होत असलेल्या गॅस सिलेंडरची प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलेंडर आवश्यक आहे. यावर जेवण शिजवणे खूप सोईस्कर पडते. परंतु अनेकदा जेवण बनवताना सिलेंडरमधील गॅस संपून जातो. अशावेळी घरी दुसरा भरलेला सिलेंडर नसला तर मोठी तारांबळ उडते.

परंतु आता तुम्ही केवळ एक टॉवेल वापरून सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाणून घेऊ शकता. सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी एक ओला टॉवेल खूप प्रभावी ठरू शकतो. यामुळे तुम्हाला आधीच समजेल की तुमचा गॅस लवकर संपणार आहे की नाही. सिलेंडरमधील गॅस तपासण्यासाठी ओल्या टॉवेलचा उपयोग : सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी एक ओला टॉवेल घेऊन तो सिलेंडरच्या भोवती गुंडाळा. सिलेंडरची टाकी टॉवेलमुळे ओली झाल्यावर टॉवेल बाजूला काढून ठेवा. मग टाकीचे निरीक्षण करा की टाकीचा कोणता भाग लवकर वाळत आहे तसेच कोणता भाग जास्त वेळ ओला राहतो. सिलेंडरच्या टाकीवरील ओला आणि सुका भाग तुम्हाला सिलेंडरमधील गॅसची लेव्हल सांगतो. म्हणजे जो टाकीचा भाग लवकर कोरडा झाला आहे तेथे गॅस शिल्लक नाही किंवा संपला आहे. तसेच जो भाग ओला राहतो त्या लेव्हलपर्यंत गॅस शिल्लक आहे असे समजावे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये काही प्रमाणात लिक्विडसुद्धा असते. त्यामुळे सिलेंडरच्या जितक्या भागात गॅस असेल, तितका भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला असतो आणि लवकर वाळत नाही. पण त्याउलट ज्याभागात गॅस नसतो तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा होतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम