इस्रायलमधून शेकडो नागरिक भारतात दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ ऑक्टोबर २०२३

इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत 2,700 लोक मारले गेले आहेत. यापैकी सुमारे 1,300 इस्रायली आहेत. आतापर्यंत सुमारे 1,400 पॅलेस्टिनींनाही आपला जीव गमवावा लागला आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की त्यांच्या सैन्याने 6 दिवसांत हमासच्या 3,600 स्थानांवर हल्ले केले आहेत. गाझावर 6 हजार बॉम्ब फेकण्यात आले आहेत. या बॉम्बचे वजन सुमारे 4 हजार टन आहे. भारत सरकारने इस्रायलमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना एअरलिफ्ट करण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियाचे विमान 212 भारतीय नागरिकांना घेऊन शुक्रवारी सकाळी दिल्लीला पोहोचले.

दिल्ली विमानतळावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सर्वांचे स्वागत केले. भारतीय वेळेनुसार, गुरुवारी रात्री 12:44 वाजता इस्रायलच्या डेव्हिड बेंगुरियन विमानतळावरून विमानाने भारतासाठी उड्डाण केले. इस्रायलमध्ये सुमारे १८ हजार भारतीय राहतात.

त्याचवेळी, इस्रायलच्या संरक्षण दलाने अशी माहिती दिली आहे की, 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर हमासने सुफा येथे 250 लोकांना ओलीस ठेवले होते. यानंतर ऑपरेशन दरम्यान त्यांना जिवंत वाचवण्यात आले. यामध्ये हमासचे 60 दहशतवादी मारले गेले तर 26 पकडले गेले. पकडलेल्या दहशतवाद्यांपैकी एक हमासचा डेप्युटी कमांडर मोहम्मद अबू अली आहे. इस्रायलने आज या कारवाईचा व्हिडिओ जारी केला आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम