पती आणि मुलांनी दुखवल ; महिलेनी कोट्यावधी रुपयांची संपत्ती मंदिराला केली दान

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ डिसेंबर २०२२ ।  समाजात अनेक लोक असतात जे सामाजिक कार्यात किवा धार्मिक स्थळावर आपली संपत्ती दान करून देत असतात, पण काही लोक आहे जे आपल्या वारसदारांना आपली संपप्ती न देता विविध मंदिराला देत असतात पण ती फक्त हजारो किवा लाखोच्या आसपास असते पण या महिलेने थेट कोट्यावाढीची संपत्ती हनुमान मंदिराला दान दिली आहे.

मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये राहणाऱ्या एका महिला शिक्षिकेने केला आहे. या महिला शिक्षिकेने आपली सुमारे एक कोटी रुपयांची संपत्ती हनुमान मंदिराच्या नावावर दान केली आहे. त्याने प्रथम आपल्या मालमत्तेचा अधिकृत हिस्सा आपल्या दोन्ही मुलांना दिला. यानंतर आपल्या वाट्याला आलेली मालमत्ता दान करण्याचा निर्णय घेतला.

समाजात अशा काही घटना घडतात की, नाईलाजाने कठोर पाऊल उचलावे लागते. अशीच एक घटना घडलेय की, त्यामुळे पती आणि मुलांना चांगलाच धडा मिळाला आहे. या दोघांच्या त्रासाने मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. यातून महिला शिक्षकेने मंदिराला आपली संपत्तीच दान करुन टाकली. शिव कुमारी जदौन नावाच्या महिला शिक्षिकेने तिच्या 2 मुलांना तिचा हिस्सा दिल्यानंतर, स्वेच्छेने तिचा हिस्सा आणि सुमारे 1 कोटी रुपये असलेली मालमत्ता आणि रक्कम छिमछिमा हनुमान मंदिर ट्रस्टला दान केली आहे.

रिपोर्टनुसार, शिव कुमारी जदौन नावाची महिला विजयपूर भागातील खितरपाल गावातील एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे. त्यांना दोन मुलगे असून त्यांनी त्यांचा वाटा या दोघांना दिला आहे. ती आपल्या मुलांना दिल्यानंतर तिने स्वेच्छेने आपल्या हिश्श्यात उरलेली सर्व मालमत्ता, घर आणि बँक बॅलन्स छिमछिमा हनुमान मंदिर ट्रस्टला दान केल्याचे महिलेने स्पष्ट केले आहे.

शिवकुमारी यांनी मृत्युपत्रात लिहिले आहे की, माझ्या मृत्यूनंतर माझे घर आणि माझी सर्व चल-अचल संपत्ती मंदिर ट्रस्टच्या मालकीची होईल. एवढेच नाही तर बँक बॅलन्स, आयुर्विमा पॉलिसीमधून मिळालेली रक्कम आणि सोने-चांदी हे देखील मंदिर ट्रस्टचे असतील. त्यांच्या मृत्यूनंतर जे काही विधी केले जातात, ते फक्त मंदिर ट्रस्टच्या लोकांनी मिळून करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. मृत्युपत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती एक कोटीच्या आसपास आहे. पती आणि दोन्ही मुलांच्या वागण्याने शिव कुमारी खूप दुखावल्या गेल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या एका मुलाने अनेक गुन्हे केले आहेत, तर तिच्या पतीची वागणूकही चांगली नाही. तिला तिच्या मुलांनी आणि पतीने इतके दुखावले आहे की तिने मृत्यूपत्रात असे लिहिले आहे की, तिच्या मृत्यूनंतर केवळ मंदिर ट्रस्टच्या लोकांनीच तिचे अंतिम संस्कार आणि पुढील विधी करावेत. मंदिराला मालमत्ता दान करण्याबाबत ती सांगते की, तिची लहानपणापासूनच देवावर श्रद्धा आहे आणि ती सुरुवातीपासून मनापासून पूजा करते. यामुळेच त्यांनी सर्व मालमत्ता हनुमान मंदिराच्या नावावर केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम