
मी तुमच्यासोबत आहे ; उद्धव ठाकरेंनी दिला शेतकऱ्यांना धीर
दै. बातमीदार । २३ ऑक्टोबर २०२२ । राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर विरोधकांनी राज्यातील शेतकऱ्यांचे होणाऱ्या अडचणीसाठी सरकारला कोंडीत पकडले आहे तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता थेट शेताच्या बाध्यावर पोहचल्याने शिंदे सरकारला आता थेट उत्तर विचारू लागले आहेत. यावेळी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत मी तुमच्यासोबत आहे असे म्हणाले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गंगापूर तालुक्यातील दहेगाव या गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या गावात किशनराव धोडे यांच्या शेतीची ठाकरेंनी पाहणी केली. ‘तुम्ही धीर सोडू नका, मी तुमच्या सोबत आहे’, असा धीर ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला.
दहेगाव येथील शेतकरी किशनराव धोडे यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले की, माझी सहा एकर शेती आहे. अतिवृष्टीमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतातील कापूस, मका, मिरची या पिकांचे मोठे नुकसान झाले. तर, गावात अजून शेतीचे पंचनामेच झाले नसल्याची माहिती दहेगावचे सरपंच विक्रम राऊत यांनी उद्धव ठाकरेंना सागितले.
शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, मी तुमच्या सोबतच आहे. मी आता मुख्यमंत्री नाही. मात्र, तुमच्यामुळेच कोरोना काळात अर्थव्यवस्था सुधारली. यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आम्हाला बँकांच्या नोटीसा येत आहेत, अशी कैफियत ठाकरेंसमोर मांडली. त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मविआ सरकारने दिलेल्या कर्जमाफीमध्ये तुमचे कर्ज माफ झाले की नाही, अशी विचारणा केली. तसेच संकट येतात मात्र तुम्ही धीर सोडू नका, असा धीरही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.सध्या पेंढापूर येथील शेतकऱ्यांच्या उद्धव ठाकरे भेटी घेत आहेत. दुपारी एक वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे औरंगाबाद विमानतळावर स्वागत झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. उद्धव ठाकरेंचे विमानतळावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ठाकरेंचे स्वागत केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम