तुझ्या पैशांपुढे झुकली नाही ; करुणा शर्मा

advt office
बातमी शेअर करा...

जळगाव मिरर । २० ऑक्टोबर २०२२ राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना टार्गेट करणाऱ्या करुणा शर्मा यांनी आजही धनंजय मुंडेंवर फेसबुक पोस्ट केलीय. ‘Karuna dhananjay munde’ या त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन आज सकाळी करुणा यांनी एक पोस्ट केलीय. खोट्या केसमध्ये अडकवणं, पैशाच्या जोरावर त्रास देणं; या कारनाम्यांनी मी झुकणार नाही, अशा आशयाची ही पोस्ट आहे.

”माझ्या गाडीत रिव्हॉल्व्हर ठेवून खोट्या केसमध्ये मला अडकवलं, घाणेरडे व्हीडिओ बनवून माझी गाडी आणि घर हिसकावलं… जेवढी ताकद लावायची तेवढी लाव. तुझ्या पैशांपुढे झुकली नाही आणि खोट्या ताकदीपुढेही. ही नारी शक्ती आहे.” अशी पोस्ट करुणा यांनी केलीय.
मागील वर्षी परळी येथे पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करण्यासाठी करुणा शर्मा गेल्या होत्या. परंतु त्यांच्या गाडीत रिव्हॉल्व्हर आढळून आलं शिवाय त्यांना महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यापोटी त्यांना जेलदेखील भोगावं लागलं. परळीमधील राड्यानंतरही करुणा शर्मा यांनी आपला लढा सुरुच ठेवला आहे. फेसबुक लाईव्ह, पोस्ट याद्वारे त्या कायम आवाज उठत असतात. आजही त्यांनी थेट नाव न घेता आ. धनंजय मुंडे यांच्यावर ही पोस्ट केलीय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम