मी म्हणजे आयोग हे काढून टाका ; चित्रा वाघांचा पलटवार !
दै. बातमीदार । ७ जानेवारी २०२३ राज्यातील महिला नेत्या व महिला अभिनेत्री असा वाद सुरु आहे. यावर दोन्ही गटाकडून आरोप – प्रत्यारोप होत आहे. तर अभिनेत्री उर्फीने आज सकाळी पुन्हा भाजप नेत्या वाघ यांना डिवचल्यावर वाघ यांनी लागलीच पलटवार केला आहे.
आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची भाषा कोणती, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हीही तिथे काम करुन आलेलो आहोत. तुम्ही म्हणजे आयोग नाही, एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो. एकटी मी म्हणजे आयोग, हे डोक्यातून काढा, असे म्हणत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्त्युतर दिले. अशा 56 नोटीसा मला आल्या आहेत. त्यात आणखी एक भर पडली, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले.
मॉडेल उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून सुरू झालेला वाद आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचला आहे. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या कामकाजावर आक्षेप घेतल्यानंतर शुक्रवारी राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यावर आज चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, आयोग म्हणजे अध्यक्षासह सदस्य असतात. महाराष्ट्राचे डीजी आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. मला पाठवलेली नोटीस सर्व सदस्यांच्या सहमतीने पाठवली का? मुंबई पोलिस आयुक्तांनी दखल घेतली नाही, हे कशाच्या आधारावर सांगता, असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच महिला आयोगाचे अध्यक्षपदी आतापर्यंत अनेकांनी कामे केली. पण कोणीही अशा विकृतीला खतपाणी नाही घातले. तुमच्यामध्ये असे काय आहे. ज्यामुळे आम्ही आकस करावा, असे म्हणत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल केला. शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम