मी अनेकांना कायमचे सुट्टीवर पाठवले ; मुख्यमंत्री शिंदे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ एप्रिल २०२३ ।  राज्यात नुकतेच दोन दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर जात असल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यातील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिले आहे.

अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी बोलू नये. मी सुट्टी घेतलेली नाही तर अनेकांना कायमचे सुट्टीवर पाठवलेले आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. दोन दिवसांपासून ते त्यांच्या मूळ गावी दरे तांब येथे मुक्कामी असून तिथे हजारो लोक त्यांना भेटण्यासाठी जात आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा पत्रकारांनी तुम्ही दोन दिवस गावी मुक्कामाला आला असल्याने आपल्या विरोधक टिका करत असल्याचे छेडले असता शिंदेंनी अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी बोलू नये, अशी कडवट टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, गेले 2 दिवस मी माझ्या गावी आलो आहे. येथे येऊनही मला भेटण्यासाठी हजारो लोक येत आहेत. त्यांच्या समस्या मी ऐकून घेत आहे. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. अधिकाऱ्यांच्या काही बैठकाही मी घेऊन काही प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच माझ्या परिसरात पर्यटनवाढीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची पाहणी केली आहे.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, मी माझ्या गावी आलो. याच्यावरुन विरोधक टीक करत असतील तर ते गैर आहे. बोलण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही बोलू नये. माझ्याकडेही बोलण्यासारखे खूप शब्द असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी बोलू नये, अशी कडवट टीका केली. दरम्यान, यावेळी कोकणासह सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी सकारात्मक उत्तरे दिली. यावेळी आता भविष्यात तुम्ही निवडणुकीला कसे सामोरे जाणार याबाबत छेडले असता, एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून भाजप-सेना युती म्हणून आम्ही काम करत आहोत. असंख्य प्रश्न, समस्या मार्गी लावल्या आहेत. लावत आहोत. सहा महिन्यात आम्ही एवढे काम केले आहे की येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच म्हणजे आमची भाजप-सेना युती निवडणूक जिंकेल व आम्ही पुन्हा सत्तेत असू, असा विश्वास व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम