मलाही मुंबई घर नाकारले होते ; भाजप महिला नेत्याचा दावा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ सप्टेंबर २०२३

महाराष्ट्रातील मुंबई येथील एका मराठी तरुणीला मुलुंडमध्ये घर नाकारण्यात आल्याच्या घटनेमुळे राज्यात संताप व्यक्त केला जात असताना आता भाजपच्या बड्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही आपल्यासोबत असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचा खुलासा केला आहे.

पंकजा मुंडे म्हणाले कि, मला सरकारी घर सोडून नवे घर घ्यायचे होते तेव्हा मलाही असाच अनुभव आला. मराठी लोकांना आम्ही घरे देत नाही असे मला सांगण्यात आले, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे मुंबईतील मराठी माणसांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुलुंडमध्ये एका तरुणीला केवळ ती मराठी असल्याच्या कारणामुळे घर नाकारण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटासह मनसेनेही या प्रकरणी कडक भूमिका घेतली आहे. आता पंकजा मुंडे यांनीही आपल्यासोबत असाच एक प्रसंग गुदरल्याचा दावा केल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज एका मराठी तरुणीची व्यथा मी पाहिली. खरे तर भाषा व प्रांतवादात पडणे मला आवडत नाही. माझ्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात मी केव्हाच जातीयवाद, भाषावाद व प्रांतवादावर भाष्य केले नाही. कुणी कोणत्या भाषेत बोलावे, कोणत्या भाषेत त्यांच्या घरांची व दुकानांची नावे ठेवावीत यातही मी फार उडी घेत नाही. पण मराठी माणसांना इथे घर न मिळणे किंवा मराठी माणसांना सोसायटीत राहण्याची परवानगी न देणे हे अत्यंत धक्कादायक व अस्वस्थ करणारे आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम