
“मी स्वत: जीव तरी देईन किंवा..” ; उर्फीची ती पोस्ट व्हायरल !
दै. बातमीदार । ४ जानेवारी २०२३ दोन दिवसापासून अभिनेत्री उर्फी व भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु असतानाच तिच्या एका पक्षाच्यावतीने पुणे पोलिसात तक्रार देण्यात आली असतांना तिने आज एक पोस्ट करून सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
चित्रा वाघ यांनी उर्फीच्या अंगप्रदर्शनावरुन तिला चांगलेच धारेवर धरले आहे. तर उर्फीदेखील त्यांना सातत्याने प्रत्यूत्तर देताना दिसतेय. उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर त्यांनी महिला आयोग उर्फीची दखल का घेत नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे. तर उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली असून त्यात आत्महत्येचा उल्लेख केला आहे.
“मी स्वत: जीव तरी देईन किंवा..”
“मला माहीत आहे की राजकारण्यांविरोधात असे पोस्ट अपलोड करणे खूप धोकादायक आहे. पण या लोकांमुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. एकतर मी स्वत:चा जीव तरी घेईन किंवा मग माझ्या मनातले बोलेन आणि त्यांच्याद्वारे मारली जाईन. मात्र या सगळ्याची सुरुवात मी केली नाही. मी कधीच कोणासोबत काही चुकीचे केले नाही. ही लोकं विनाकारण माझ्या मागे लागली आहेत”, असे उर्फीने लिहिले आहे.उर्फीने या आधीच्या पोस्टमध्ये चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्या मैत्रीचा उल्लेख केला होता. यात तिने चित्रा वाघ यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. “मी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर चित्रा वाघ आपण एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी नक्कीच बनू. चित्रा जी, तुम्हाला संजय राठोड आठवतात का? तुम्ही भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली आणि तुम्ही त्यांच्या सर्व चुका विसरलात. पण राष्ट्रवादीत असताना मात्र त्यांच्यावर अनेक आरोप केले होते,” असा उपरोधिक टोला तिने चित्रा वाघ यांना लगावला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम