राज्यपालांपासून महाराष्ट्राची सुटका तर आनंद : पवार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ जानेवारी २०२३ । राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्र लिहून राज्यपाल पदावरुन मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर अशा राज्यपालांपासून महाराष्ट्राची सुटका झाली, याचा आम्हाला आनंद आहे, असा टोला शरद पवारांनी लगावला.

आज पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, गेल्या 5-10 वर्षातील सी व्होटरचे अहवाल बघितले तर त्यांचे अंदाज अचूक ठरत असल्याचे दिसते. आतादेखील या अहवालाने विरोधकांना एक दिशा देण्याचे काम केले आहे. ही आकडेवारी सत्ताधारी पक्षांच्या सोईची नाही. त्यांची चिंता वाढवणारी आहे. शरद पवार म्हणाले, अहवालानुसार देशात काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार राहणार नाही, असे दिसतेय. तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोक गांभीर्याने घेतात, हे देखील या अहवालातून समोर आले आहे.

शरद पवार म्हणाले, सी व्होटरच्या अहवालाने विरोधकांना दिशा दाखवली आह. भाजपविरोधात देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी स्वत: अनेक जणांशी बोलत आहे. मात्र, काही स्थानिक मुद्द्यांवरुन अडथळे येत आहेत. जसे की, केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने डाव्यांसोबत सत्ता स्थापन केली आहे. तिथे काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. मात्र, देशात आम्ही काँग्रेससोबत आहोत. त्यामुळे केरळमध्ये लोकसभेच्या जागा कशा लढवायच्या, असा पेच आहे. दोन दिवसांत संसदेचे अधिवेशन सुरू होईल. तेव्हा यासंदर्भात अधिक चर्चा करता येईल. वंचित बहूजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार का?, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, शिवसेनेने वंचित बहूजन आघाडीशी युती केली आहे. त्यांच्या चर्चेत आम्ही नव्हतो. तसेच, वंचितबाबतचा प्रस्तावच अजून आमच्याकडे आलेला नाही. प्रकाश आंबेडकरांसोबत आमची काहीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे वंचितचा मविआत समावेश होणार की नाही?, याबाबत काय मत व्यक्त करणार. जेव्हा वंचितबाबत प्रस्ताव येईल, तेव्हा या विषयावर बोलता येईल.

पुढे शरद पवार म्हणाले, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने एकत्रित लढवाव्यात, अशी आमची भूमिका आहे. निवडणुकांना अजून एक वर्ष आहे. त्यावेळेसच जागावाटपाबाबत भूमिका स्पष्ट करू विरोधी पक्षांविरोधात केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. शरद पवार म्हणाले, सी व्होटरच्या अहवालानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणांकडून सातत्याने तृणमुल काँग्रेसच्या मंत्र्याविरोधात धाडी, छापे टाकले जातात. अशा प्रकारे विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास देण्याचे हे प्रकार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम