राज्यात थंडीचा जोर वाढला तर या जिल्ह्यात 5.5 अंश सेल्सिअस तापमान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० डिसेंबर २०२२ ।  राज्यात दोन ते तीन दिवसापासून थंडीचा जोर वाढत असून जळगाव जिल्ह्यात मात्र दोन दिवसापासून थंडी जरी कमी असली तरी आज शनिवारी सकाळी थंडीचा जोर वाढला होता तर मुंबईसारख्या शहरी भागात प्रदूषणाची हवा जाऊन आता स्वच्छ सुंदर वातावरण आकाशात पाहायला मिळतं आहे. त्यातून आता शहरी तसेच ग्रामीण भागात थंडीची जोरदार सुरूवात झाली आहे. आता सगळेच लोकं खासकरून ग्रामीण भागात आपल्या घराबाहेर शकोटो पेटवून लागले आहेत. तसेच घराघरात खमंग गरमागरम पदार्थांचा वासही घमू लागला आहे. त्यातच आता सुती कपडे शहरीच काय ग्रामीण भागातही विंटर फॅशन फोलो होतेय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सध्या तापमान हे बऱ्याच अंशी खाली घसरले आहे. गोंदियात तापमानाचा पारा 8.8 अंश इतका खाली आहे तर निफाडमध्ये 6.3 तापमानाची नोंद झाली होती.

गोंदियात दुसऱ्या दिवशी पारा घसरला. विदर्भात सर्वात जास्त थंडी ही गोंदिया जिल्ह्यात आहे. गोंदिया जिल्ह्याचा पारा वर जात असतानाच अचानक दोन दिवसांपासून त्यात घसरण होत आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्याच तापमान 8.8 अंशावर असून एक दिवसाआधी गोंदिया जिल्हाचा तापमान 10.2 अंशावर होते तर आज पुन्हा तापमानात घसरण झाली व गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात ‘थंडगार’ ठरला आहे. जिल्ह्यात थंडीचा जोर अधिकचा वाढल्याने जिल्ह्यतील अनेक नागरिक शेकोटीचा सहारा घेत असुन गरम कपड्यांचा वापर करत आहेत.

गोंदियापाठोपाठ निफाडचाही पारा घसरला असून निफाड येथे 6.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका पुन्हा गारठून निघाला आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात 6.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाड करांना थंडीमुळे हुडहुडी भरली असून या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यात हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 5.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून तापमानात सतत घट होत आहे. तापमानाचा पारा 15 अंशावरून पाच अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतला आहे. सकाळच्या वेळी रस्ते निर्मनुष्य दिसून येत आहेत तर सकाळी फिरायला निघणाऱ्या नागरिकांची संख्या ही रोडावली आहे. कडाक्याच्या थंडीसह गार वारे वाहत असल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. बोचर्‍या थंडीचा मारा हा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम करणारा ठरतोय. सर्दी, खोकला या आजारांनी जोर धरला आहे. ज्येष्ठ नागरिकांना या थंडीचा सर्वाधिक फटका बसतो आहे. तर रात्रीच्या वेळेस रबी पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांचे ही प्रचंड हाल होत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम