काम केलंय तर होर्डिंगची गरजंच काय? ठाकरेंचे सर्वपक्षांना आवाहन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ नोव्हेबर २०२२ वाढदिवस असो कि स्वागत राज्यभर जर जास्त होर्डिंग प्रत्येक गल्लीपासून ते दिल्लीपर्यत लागत असतील ते फक्त राजकीय मंडळीचे. मुंबई शहर विदृप होतंय, राजकीय होर्डिंग लावू नका असं आवाहन शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सर्वपक्षांना केलं आहे. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये आदित्य ठाकरेंनी सडेतोड राजकीय भूमिका मांडली. काम केलंय तर होर्डिंगची गरजंच काय? असंही त्यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, “सध्याच्या राजकीय परिस्थितीत मुंबई सगळीकडं राजकीय होर्डिंग्ज पहायला मिळतात, ज्यामुळं संपूर्ण शहर विदृप दिसत आहे. आम्हीही अशा प्रकारचे होर्डिंग लावले आहेत पण आता सर्वांनी हे राजकीय होर्गिंड लावायचं थांबवलं पाहिजे”

कारण ज्यावेळी आपण मुंबई शहरात फिरतो तेव्हा खूपच ऑकवर्ड वाटतं. आपल्याला ट्रॅफिक सिग्नलही दिसू शकत नाही केवळ आमचे चेहरेच दिसत आहेत. आम्ही राजकीय लोक त्यामध्ये इंटरेस्टेड असू पण सर्वसामान्य लोकांना त्यात स्वारस्य नाही. हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आपण होर्डिंगशिवाय काम करायला हवं, लोकांना काम हवंय लोक ते पाहून तुम्हाला मतदान करतील त्यासाठी होर्डिंगची गरज नाही, हा मुद्दाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी यावेळी मांडला, असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम